Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

गंगामाई कॉलेज ऑफ बी फार्मसी महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षक दिन साजरा...!



नगाव येथील गंगामाई कॉलेज ऑफ बी फार्मसी महाविद्यालयात कोवीड 19 मुळे प्रथमच ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिन साजरा झाला. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असतो. 

ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिलकुमार टाटीया यांनी व्यक्त केली होती त्यास महाविद्यालयाचे प्रा. श्री मनोज पाटील व प्रा. शलाका बोरसे यांनी नियोजन करून ऑनलाईन कार्यक्रमाची रूपरेषा आखली .सर्व प्रथम कार्यक्रमात सरस्वती मातेस व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले व त्यानंतर महाविद्यालयातील प्रणव जाधव,श्रुती गवळी,ओम शिरसाठ,नीरज कुलकर्णी यांनी शिक्षक दिनानिमित्त त्यांचे विचार मांडले नंतर कार्यक्रमाचे आयोजक प्रा. श्री मनोज पाटील यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व काय ते सांगितले तसेच शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सहभाग काय असतो हे पटवून दिले,शिक्षकांचा फक्त शिक्षक दिनिच आदर न करता तर जीवनभर त्यांची आठवण व आदर ठेवावा. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी त्यांच्या जीवनात यश गाठू शकता असे प्रा. मनोज पाटील यांनी सांगितले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टाटीया यांनी  अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर कसे व्हावे हा संदेश दिला. 

तसेच प्लेसमेंट संदर्भात मुलांशी संवाद साधताना त्यांनी मुलांना औषध निर्माण कंपनीत नोकरी मिळवण्यासठी काय काय करावे याचे सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे केले .विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात धैर्य ,स्तिरता व सकारात्मता ह्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी चाण्यक्या निती या ग्रंथा द्वारे संस्कृत श्लोक वाचन करून त्याचे मराठीत अर्थ समजून सांगितला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षातील विद्यार्थी अक्षय पाटील याने केले तर कार्यक्रम यशस्वी ते साठी प्रा. मनोज पाटील व प्रा शलाका बोरसे यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव श्री बाळासाहेब मनोहर भदाने,उप अध्यक्ष सौ माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर भदाने,अध्यक्ष राम दादा भदाने,प्राचार्य डॉ अनिलकुमार टाटीया, उप प्राचार्य डॉ सुफियान अहमद व प्राध्यापक वृंद यांनी कौतुक केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध