Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
महात्मा फुले चौकाचे सौंदर्यीकरण करा...! माळी युवक संघटनेची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी...!
महात्मा फुले चौकाचे सौंदर्यीकरण करा...! माळी युवक संघटनेची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी...!
शेगाव(प्रतिनिधी उमेश राजगुरे)येथील चार मोरी पुलाजवळ असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी माळी युवक संघटने च्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.. शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेगाव शहरातील सर्वच महापुरुषांच्या चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
मात्र क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकाचे अद्यापही सौंदर्यीकरण करण्यात आलेले नसून नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर चार मोरी पुलाजवळ असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले चौकाचे सौंदर्यीकरण कामाला प्रारंभ करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर माळी युवक संघटनेचे शेगाव शहराचे अध्यक्ष ऋषिकेश गजानन लहाने यांच्यासह धनंजय गजानन लोखंडे पवन पोटदुखे सागर गणगणे प्रशांत खेरडे संकेत भीर्डे महादेव घाटोळ अनिकेत मयुर खेरडे अभिषेक लोखंडे धनंजय गणगणे अभिषेक गणगणे गजानन पल्हाडे निलेश कलोरे श्रीकांत काळे गणेश असोलकर अविनाश पाचपोर उमेश खेर्डे आशिष गणगणे राजूभाऊ कलोरे शैलेश डाबेराव आदींच्या सह्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा