Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०
भोई समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार प्रकाश लौणारे
शिरपूर, प्रतिनिधी दि.14 भाजपा निमंत्रित सदस्य प्रकाश लोणारे यांनी शिरपूर येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी तालुक्यातील भोई समाज बांधवांशी चर्चा केली.तसेच भोई समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करून प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना आश्वासन दिले.
नागपूर येथील भोई समाजाचे नेते तसेच भाजपाचे विशेष निमंत्रित सदस्य प्रकाश लोणारे यांनी शिरपूर येथे भेट देऊन, शासकीय विश्रामगृह येथे भोई समजतील कार्यकर्ते यांच्यासोबत विविध विषयावर समाजहिताच्यादृष्टीने चर्चा केली.
यावेळी शिरपूर तालुका भोई समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शिरपूर तालुका भोई समाज आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सी.एम.भोई, माजी तालुकाध्यक्ष भाईदास मोरे , तालुकाध्यक्ष सुभाष भोई, शहरअध्यक्ष भोजराज ढोले, शैक्षणिक गुणगौरव समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे, डॉ.दिघोरे, तरुण गर्जनाचे संपादक संतोष भोई, कवी यशवंत निकावडे,सुदाम मोरे, समाजाचे ता.उपाध्यक्ष गुलाब भोई, समाज तंटामुक्ती अध्यक्ष दंगल भोई,विजय मोरे, दिलीप ढोले, राजू सोनवणे, सरलाल भोई आदी उपस्थितीत होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा