Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०
वाढदिवस आभार संदेश...!आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद…!
धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते. पण व्यक्त झाल्याशिवाय कधी-कधी पर्यायच नसतो.
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आठवणीने स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्या. या दिवशी विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रातील लहान, थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमूल्य शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो. तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी ताकद आहे.
माझ्या आजवरच्या वाटचालीत आपल्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि स्नेह यांचा बहुमोल वाटा आहे. या शुभेच्छा म्हणजे तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा व आजवर मिळालेली अतूट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो “प्रेम बंधनाचा सोहळा” म्हणता येईल.
मनुष्य-जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे, तितकीच किंमत ही वेळेची देखील आहे. आपण आपला अनमोल वेळ काढून मला फोन, टेक्स्ट मेसेजेस, व्हाट्सअप, फेसबुक इ. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच भेटून दिवसभर शुभेच्छा दिल्या.आपल्या प्रेमाच्या वर्षावाने मी न्हाऊन निघालो. आपल्या शुभेच्छांच्या जोरावर मी माझ्या पुढील आयुष्यात समाज सेवेच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी पार पडण्याचे बळ मला मिळेल.
या प्रेमाने विवेक, विकास व सेवा या संकल्पना माझ्या आयुष्यात दृढवत करतील. मी व्यक्तिशः प्रत्येकाला धन्यवाद देतो. असेच स्नेह व प्रेम माझ्यावर निरंतर राहू द्या.
आपलाच
अमरिशभाई पटेल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा