Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

राष्ट्रवादी पदवीधर, राज्यव्यापी रक्तदान शिबीराला परंडा येथून सुरुवात....





परंडा (राहूल शिंदे):- दि.27 देशात व राज्यात मोठय़ाप्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे,त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पदवीधर संघ महाराष्ट्र आयोजित राज्यव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून   परंडा येथे जुनी नगर परिषद येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते . 

या शिबिरात रक्तदात्यांचे अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.सोशल डिश्टनशिंगचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेनगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी बोलताना सांगितले.

राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक आहे.राष्ट्रवादी पदवीधर जिल्हा अध्यक्ष अॅड दशरथ कोळेकर असे म्हणाले.

 यावेळी माजी कृषी सभापती  नवनाथ जगताप ,युवक तालुका अध्यक्ष धनंजय पाटील ,जिल्हा मजूर फेडरेशन चे संचालक धनंजय हांडे ,बापू मिस्किन , दीपक भांडवलकर ,काळे सर ,प्रा शरद झोंबाडे, राष्ट्रवादी पदवीधर जिल्हा अध्यक्ष अॅड दशरथ कोळेकर, तालुका अध्यक्ष ओमराजे पाटील ,अण्णासाहेब देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले  वैभव देशमुख,प्रकाश शिंदे, शिंदे बी.एस, यांनी देखील,विशेष सहकार्य केले.याबरोबरच  मोठय़ाप्रमाणात कार्यकर्ते उपस्थितीत होते या शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध