Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०
सौ.मंजूषा चव्हाण यांची आरोग्यदूत पदी नियुक्ती...!
उस्मानाबाद(राहुल शिंदे) दि.7 उमरगा येथील सौ मंजूषा चव्हाण यांची विश्व जन आरोग्य सेवा समिती मार्फत ''उमरगा तालुका आरोग्य दूत'' पदावर संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत,सचिव श्री.प्रशांतदादा भोसले, प्रदेश सल्लागार श्री.निलेशदादा साठे, प्रदेश संपर्क प्रमुख श्री.रविंद्रदादा पाटील यांनी सौ.मंजूषाताई चव्हाण यांच्या सामजिक कार्याची दखल घेऊन निवड केली आहे व तसे नियुक्तीपत्र दिलेले आहे.
आपण विश्व जन आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा आणि वारसा समितीचे नियम आणि सर्व बंधने पाळून चांगल्या प्रकारे मानवतेचे कार्य करून रुग्णांचा आधार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवडीबद्दल विश्व जन आरोग्य सेवा समितीचे धाराशिव (उस्मानाबाद)जिल्हा समन्वयक श्री.सोमनाथदादा कोकाटे व परंडा तालुका आरोग्यदूत श्री.राहुल शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा