Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
७२७ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा..! माजी मंत्री गिरीश महाजनांच्या पाठपुराव्याला यश...!
७२७ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा..! माजी मंत्री गिरीश महाजनांच्या पाठपुराव्याला यश...!
जामनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील सुमारे ७२७ वर शेतऱ्यांना त्यांच्या बँक खात्यासह अन्य तांत्रीक अडचणींमुळे कर्जमाफीपासुन वंचीत राहीले होते,तसा प्रस्ताव स्थानीक पातळीवरून मंत्रालयात पाठविण्यात आला होता,
अखेर माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी संबंधीत सहकार मंत्रालय आणी विवीध शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून त्या वरील सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती स्वतः गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली.तालुक्यातील बेटावद खुर्द,वाडी,मोयगांव,मांडवे, मोहाडी,सोनारी,भागदारा,वाकी,नांद्राहवेली,वाघारी आदी गावातील शेतकऱ्यांपैकी काहींची नावांत बदल, खातेक्रमांकात तफावत तर काहींच्या कर्जमाफीची रक्कम चुकीची दाखविण्यात येत होती अशा विवीध अडचणींमुळे तालुक्यातील ७२७ शेतकऱ्यांना कर्जमाफीपासुन वंचीत रहावे लागले होते.आता वरील सर्व त्रृट्या दुर करण्यात आल्याने कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याचेही श्री महाजन यांनी सांगीतले.
तसा सुधारणायुक्त प्रस्ताव जिल्हा बँकेसह प्रशासनाच्या संबंधीत विभागाकडे पाठविण्यात येऊन,त्यासाठीची कर्जमाफिची रक्कम सुध्दा बँकेकडे तात्काळ वर्ग करण्यात आल्यामुळे या सव्वासातशेवर शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने मनस्वी समाधान वाटत असल्याचेही माजीमंत्री महाजन यावेळी म्हणाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा