Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

सततच्या पडणाऱ्या पावसाने मुंग पिकाचे मोठे नुकसान...!



शिरपूर प्रतिनिधी :सततच्या पडणाऱ्या पावसाने मुंग पिकाच्या ऐन काढणीच्या वेळेस मुंग पिकाला कोंब येऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील काही गावातील नुकसानीची पाहणी करावी व कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५,००० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कृषी पदवीधर संघटना (शिरपूर तालुका) यांच्या वतीने मा.तहसीलदार आबा महाजन साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली तरी यावेळी कृषी पदवीधर संघटनेचे उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी ,युवक तालुका उपाध्यक्ष प्रेम चौधरी, विद्यार्थी तालुका अध्यक्ष आशिष सिसोदिया व ललित पाटील,निखिल पाटील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध