Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

सांगली शहरातील 100 फुटी रस्त्यावर दोन्ही बाजूनेअतिक्रमण..!



सांगली प्रतिनिधी:सांगली शहरांतील 100 फुटी रस्त्यावरदोन्ही बाजूला खोकी धारकांनी अतिक्रमण केले असून त्या रस्त्यावर येणाऱ्यांची जाणाऱ्यांची वाहनांची संख्या खुप आहे पण रस्ता हा 100 फूट असून  त्या खोकी धारकांनी रस्तावरच आपले साम्राज्य मांडले असून रस्ता येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना अडचण होत आहेशिवाय रस्ता हा खराब झाला असून त्या रस्त्यावर खड्डे असून रस्ता हा खराब झाला आहे .याचा जनतेला त्रास होत आहे.

तेथील नगरसेवक ह्याचे दुर्लक्ष होत असून प्रशासन याचा वेळीच बंदोबस्त करावी अशी मागणी होत आहे लवकरात लवकर खोकी धारकांना नोटीस पाठवून याचा पाठ पुरावा करावा रस्त्यावर पडलेले खड्डे रस्ते दुरुस्त करून घेऊन रस्ता  दुरुस्त करावा व अतिक्रमण काढून घेऊन वाहनांसाठी हा रोड म्हत्वाचा असून तो कोल्हापूर हुन मिरज कडे जातो त्यासाठी प्रशासनाला वेळीच लक्ष द्यावे नाहीतर रोज नवीन दुर्घटना होत राहणार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध