Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

बीज प्रकियेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन..!



मालपूर: खर्चात होणारी बचत फायदेशीर
मालपूर: शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विकासरत्न सारकरसाहेब रावल कृषी महाविद्यालय, दोंडाईचा येथील कृषिदूत देवेंद्र निंबा सोनवणे याने कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे शेतकर्यांना जैविक आणि रासायनिक पद्धतीने होणाऱ्या बीजप्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.

कृषिदूतांनी गाव परिसरातील शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया पद्धतीचा कसा वापर करावा याबाबत माहिती दिली. बीजप्रक्रिया पद्धतीमुळे पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. 

तसेच रोगनियंत्रणाच्या खर्चात बचत होते. बियाण्यांची उगवण क्षमता वाढून उत्पनात वाढ होते. बियाणांचा दर्जा वाढवला जाऊन बाजार भाव मिळतो. हे लक्षात घेऊन देवेंद्र सोनवणे यांनी बीजप्रक्रिया पद्धत कशी करावी, त्याचे फायदे व परिणाम याबाबत माहिती दिली. यावेळी राजधर वसाईकर, सखाराम पाटील, घनश्याम धनगर, चेतन मराठे, राहुल सुर्यवंशी, हर्षल गोराने, प्रतीक चौधरीआदी शेतकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध