Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

ऐनपूर महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिवस”साजरा...! वाचाल तर टीकाल प्रा.एम.के.सोनवणे...!


प्रतिनिधी रावेर:निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना एकक व ग्रंथालय या विभागातर्फे १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच डॉ.ए.पी जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी लाभलेल्या वक्त्यांचा परिचय महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ.संदीप साळुंके यांनी करून दिला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून निंभोरा येथिल रहिवाशी व विवरे खु. येथील जि.प.मराठी शाळेचे पदवीधर शिक्षक दिपक सोनार,व ऐनपूर महाविद्यालयातील प्रा.एम.के.सोनावणे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वाचन करून आपला आत्मविश्वास वाढविला पाहिजे तसेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे असे शिक्षक दिपक सोनार यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना सांगितले. 

तसेच वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढतो असेही ते म्हणाले.
प्रा.एम.के.सोनावणे यांनी वाचाल तरच टिकाल असे परखड सांगत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या चरित्राविषयीची माहिती दिली. तसेच वाचन म्हणजे काय, वाचन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. 

वाचन करतांना आकलन होणे गरजेचे आहे व वाचनामुळे ज्ञान प्राप्त होते असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आज पासून सुरुवात करून एक तरी पुस्तक वाचावे असेही त्यांनी सांगितले. तसेच वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यात विचार करण्याची दृष्टी व शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी हा आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा.डॉ.जे.पी.नेहेते यांनी तर आभार सहाय्यक अधिकारी प्रा.डॉ.डी.बी.पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी एकूण ११० प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यायातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.जे.पी. नेहेते, प्रा.एस.एस.साळुंके, प्रा.डॉ.डी.बी.पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सौ.रेखा पाटील, प्रा.दिलीप सोनवणे व प्रा.डॉ.एस.एन.वैष्णव यांनी परिश्रम घेतले.

फोटोत विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्व विषद करतांना प्रा.एम.के.सोनवणे व शिक्षक दिपक सोनार सोबत प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने, प्रा.डॉ.साळूंके, प्रा.डॉ. डी.बी.पाटील



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध