Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर,थांबलेले लसीकरण पुन्हा सुरू करा.- रविंद्र पाटील
उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.27 विश्वजन आरोग्य सेवा समितीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख रविंद्र पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मेलद्वारे कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांचे थांबवलेले लसीकरण कोरोनाची आवश्यक ती काळजी घेऊन सुरक्षीतरित्या सुरू करावे,
लसीकरणाचे फायदे तोटे अभ्यासावेत अशी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पुणे मनपा मधे बालकांचे लसीकरण 21 टक्के झाल्याचं सांगण्यात आले आहे.याचा अर्थ जवळजवळ 80 टक्के बालके आणि त्यांची संख्या जवळजवळ वीस ते तीस हजार बालके लसीकरणापासून वंचित आहेत. हे जरी काहींच्या मते धोकादायक आणि काळजी करणारे असेल तरी याचा, या आपत्तीचा उपयोग लसीकरणाचा फायदा की तोटा याचा अभ्यास करायला करून घेता येऊ शकतो. लस मिळालेली अकरा हजार बालके व लस न-मिळालेली पंचवीस ते तीस हजार बालके हे दोन गट उघड दिसतात. आता अशा बालकांची वर्षभरातील प्रगती, आजाराचे प्रमाण, कुपोषणाचे प्रमाण वाढ असे काही मापदंड घेऊन अभ्यास केला असता लसीकरण मिळणे हे फायद्याचे आहे का तोट्याचे? या शंकेचे निराकरण होऊ शकते.
याला वैद्यकीय शास्त्रीय भाषेत " नैसर्गिक अभ्यास" असं म्हटलं जातं . कारण कोणत्याही वीस तीस हजार बालकांना ठरवून लसीकरण न देणं हे शक्य नसतं . पण अशा कुठल्यातरी कारणामुळे ती बालके लसीकरणापासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांची तुलना लसीकरण मिळालेल्या बालकांच्या आरोग्याची केली तर हा नैसर्गिक अभ्यास होऊ शकेल. तेव्हा याचा आरोग्य मंत्री यांनी विभागास अभ्यास करायला लावावे.
तसेच पोलिओ, गोवर आणि धनुर्वात यांसारखे आजार पुन्हा उद्भवू नये आपण covid-19 च्या आजाराशी आता लढत आहोत पण अश्यात ह्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते म्हणून सरकारी आणि निमसरकारी दवाखान्यात एक वेगळ्या लसीकरण विभागाची किंवा वार्ड ची लवकरात लवकर सुरवात करावी जेणेकरून बालमृत्यू च्या समस्येला सामोरे जाण्यापासून आपण वाचू शकतो.
घरोघरी जाऊन सर्व काळजी घेऊन आपण आणि पालकांनी मिळून ह्यावर संवाद साधून मार्ग काढावा नाहीतर भविष्यात मोठी समस्या उभी राहू शकते.
केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी ह्यावर काळजीने लक्ष घालावे अशी मागणी रविंद्र पाटील यांनी विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र मार्फत केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा