Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०
रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांचे आमरण उपोषणाचा इशारा...!
हुपरी प्रतिनिधी:हुमायून नदाफ रेदाळ गावात मानेनगर प्रभागात गेल्या काही वर्षापासून स्वाईन फ्लू, डेंग्यू व मलेरियाने काही रुग्ण दगावले आहेत. त्यातच चालू वर्षी कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक व घर परिसरातील स्वच्छतेला जादा महत्त्व आले आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच पाऊले उचलत गावाची स्वच्छता व सनिटाईझर फवारणी केली आहे.
परंतु सध्या पावसाळ्याच्या हंगाम असून साथीच्या विविध रोगांचा फैलाव झालेला आहे. यामुळे नागरीकांना विशेषतः आपल्याच माता-भगिणीसह आपणालाही त्रास होत आहे.
तसेच कोरोनाच्या धास्तीने इतर साथीच्या आजाराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एखाद्या नागरीकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासन केव्हा लक्ष देणार असे प्रश्न निर्माण होत आहेत. तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून प्रत्येक प्रभागांची स्वच्छता करणे, गटर्स-नाले यांची साफसफाई करणे, बी एम.सी. पावडर फवारणे, डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी धुराची फवारणी करणे, डुकरे पकडून डुकारांच्या बेसुमार वाढलेल्या संख्येचा बंदोबस्त करणे आदी कामे लवकरात लवकर व्हावी. तसेच प्रभागामध्ये बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करणेत यादीत या संदर्भातग्रामपंचायतीला मागील मासिक मिटींग मध्ये अर्ज देण्यात आला होता. सदर अर्जानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करणेत येईल. असे आश्वासन दिले होते. तरी आज अखेर वरील प्रश्नांबाबत कोणतेही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही त्याचा दुष्परिणाम व ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजी पणामुळे मानेनगर प्रभागात डेंग्यूचे ५ , चिकन गुणिया १०, मलेरिया ५ रूग्ण आढळून आलेले आहेत व १ संशयित मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मानेनगर व अंबाबाईनगर प्रभागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर रेंदाळ गावास जलस्वराज्य प्रकल्पा अंतर्गत ४ दिवसातून एकादा प्रत्येक
नळ पाणी पुरवठा केला जातो. काही वेळेस विविध कारणास्तव १ दिवस उशिरा पाणी पुरवठा होत असे सध्या ८ ते ९ दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याचबरोबर ग्रामपंचायत मधील सफाई , लिपिक कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्याचे पगार थकीत आहेत आधीच नागरिक लॉकडाऊनमुळे घायकतील झाले आहे. चार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे त्यांचे प्रापंचिक व आर्थिक गणित कोलमडले आहे तरी त्यांचा थकीत पगार लवकरात लवकर त्यांना अदा व्हावा तसेच काही कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी
मौजे रेंदाळ मानेनगर व अंबाबाईनगर प्रभागातील 14 व्या वित्त आयोगातील अंतर्गत रस्ते सुधारणा कामे मंजूर असून गेली 1 वर्षे रखडीत पडले आहेत. तसेच अंबाबाईनगर मेनरोडवर सांडपाणी रस्त्यावर येवून नवीन केलेले रस्ते खराब झाले आहेत. सदर ठिकाणी गटर्सची व्यवस्था करणेत यावी.
वरील सर्व प्रश्नां संदर्भात एक महिन्यापूर्वी मासिक मिटींग तसेच तोंडी सांगूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. म्हणून या संदर्भात दि.०८.१०.२०२० रोजी ठिय्या आंदोलन करणेत आले. तरीही मा.गटविकास अधिकारी , ग्रामपंचायत प्रशासन यांनी आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले.
तरी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करणेत यावी, अन्यथा नाईलाजास्तव शिवसेना स्टाईलने सोमवार दि. १२.१०.२०२० रोजी मानेनगर, रेंदाळ येथे आमरण उपोषण सुरु करणेत येणार असे निवेदन देण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा