Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

परतीच्या पाऊसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे न करता, हेक्टरी 50हजार रुपयाची मदत जाहीर करावी... - मनसे


तुळजापूर (राहूल शिंदे) दि.16 तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन, तूर, मका, उडीद, ऊस व इतर पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले सोयाबीन तसेच वाळविण्यासाठी काढून ठेवलेला सोयाबीन याचे पूर्णतः नुकसान झालेले आहे काही भागात तर अतिवृष्टीने आलेल्या पुराने सोयाबीनचे गंजही वाहून गेले आहेत तर उडीद, तूर, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरे तर या वर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. आता तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही शासनाने शेतकऱ्यांसमोर पंचनाम्याचे गुराळ न गाळता सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर करून अनेक संकटांनी घेरलेल्या शेतकर्‍यांना आत्महत्येपासून वाचवावे ही नम्र विनंती.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे या निवेदनात म्हंटलेले आहे.

यावेळी तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम, शहर उपाध्यक्ष अविनाश पावर, समीर शेख विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध