Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

पंचनामे न करता अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत जाहीर करावी-मनसे


उस्मानाबाद (राहूल शिंदे ) दि.१६ जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन,तूर,मका,उडीद,ऊस व इतर पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले सोयाबीन तसेच वाळविण्यासाठी काढून ठेवलेला सोयाबीन याचे पूर्णतः नुकसान झालेले आहे काही भागात तर अतिवृष्टीने आलेल्या पुराने सोयाबीनचे गंधही वाहून गेले आहेत.

 उडीद,तूर,सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खरे तर या वर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे.बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटाला सामोरे जावे लागले त्यानंतर कोरोणामुळे दूध भाव कमी झाल्याने शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसाय अडचणीत आला, या वर्षी कांद्याचे भाव कमी झाल्याने व काम असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला व त्यानंतर भाव वाढल्यास केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे.

 हे सर्व नुकसान होत असताना महाराष्ट्रातील शेतकरी टाहो फोडून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करीत आहेत प्रत्येक वेळी राज्य सरकारने आम्ही पंचनामे करून नुकसानभरपाई देऊ आमचे सरकार शेतकरी हिताचे आहे अशी पोकळ आश्वासने दिली पण प्रत्यक्ष मात्र मदत कधीही केलेली नाही.

 आता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही आपण शेतकऱ्यांसमोर गुराळ पंचनाम्याचे मांडत आहोत तरी पंचनामे न करता मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करून अनेक संकटांनी घेरलेल्या शेतकर्‍यांना आत्महत्येपासून वाचवावे ही नम्र विनंती.

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा बाद तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मा.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना पाठवले आहे या वेळी सागर बारकुल कळंब तालुका अध्यक्ष,मुरलीधर देशमुख तावजखेडा सरपंच,चंद्रकांत शेटे, सौरभ देशमुख, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध