Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

खेळाचे जीवनातील महत्व आणि व्यक्तिमत्व विकास ! ! !



मुलांच्या जडणघडणीत खेळाला अनन्य साधरण महत्व आहे.खेलण-बघडण हे मुलांच्या आवडीचे क्षेत्र आहे.यातच योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले करियर देखील घडू शकते.याचाच मागोवा घेणारा एक मार्गदर्शनपर लेख.

झपाट्याने शहरीकरण होणाऱ्या नगरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप कमी मैदाने उपलब्ध असताना आपल्याला आढळून येतात. त्यातच पालकांची रोजची दैनंदिन कामासाठी चाललेली धावपळ यासारख्या कारणांमुळे बऱ्याचदा मुलांकडे दुर्लक्षाही होते.त्यामुळे मुलं एकटी पडायला लागतात आणि मुलांची योग्य ती वाढ होण्यास अडथळा निर्माण होतो.

जर मुलांचा सर्वांगीण विकास हवा असेल तर त्यासाठी मुलांची दैनंदिन जीवनात शारीरिक सक्रियता असणे खूप महत्वाचे आहे.खेड्यातील मुलांच्या प्रमाणात शहरी मुलांच्या मूलभूत हालचाली खूप कमी प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतात.हल्ली मुलं कार्टून,पबजी सारख्या गेम यांना बळी पडताना आपणाला दिसून येतात याचाच परिणाम नकळत त्यांच्या शरीरावर पडलेला दिसून येतो.मुलांमध्ये वाढते नैराश्य,न्यूनगंड यांमुळे मुले आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत, तसेच वाढते प्रदूषण,रोगराई यांसारख्या समस्यांना तोंड द्यायचे असेल तर समतोल आहार व रोज मुलांची शारीरिक हालचाल होणे गरजेचे आहे.नियमित व्यायामामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते व मुलं सुदृढ बनतात.तसेच नियमित झालेल्या शारीरिक हालचालीमुळे त्यांच्यात उत्साह वाढून त्यांच्या मानसिकतेत बदल होतो.

आज देशाला जर आत्मनिर्भर आणि सक्षम नागरिक हवा असेल तर त्यांना लहानपणापासूनच शारीरिक सुदृढतेचे धडे देणे गरजेचे आहे.लहान मुलांनी दररोज किमान अर्धा एक तास शारीरिक हालचाल केली पाहिजे.म्हणजे किमान आपला एखादा आवडता खेळ तरी नियमित पणे खेळला पाहिजे.जेंव्हा शारीरिक क्षमतेचा विकास होईल तेंव्ह मुलांच्या बौध्दिकतेतही वाढ होईल.यासाठी पालकांचे ही सहकार्य खूप महत्वाचे आहे.यासाठी बऱ्याच शाळांमध्ये क्लब मध्ये शारीरिक शिक्षण आणि खेळ प्रभावी पणे राभवले जात आहे फक्त पालकांच्या सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे.

काही पालकांच्या मते खेळणे बागडणे म्हणजे व्यर्थ वेळ वाया घालवणे आहे,पण इतर गोष्टीप्रमाणे मुलांच्या शारीरिक हालचालींना पण महत्व देणे गरजेचे आहे.आज कोरोना सारख्या महामारी मुळे जगात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे,पण ज्यांची शारीरिक सुदृढता चांगली आहे,रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यांना मात्र यापासून काहीही नुकसान झालेले दिसून येत नाही.आणि चांगली शारीरिक क्षमता कमवायची असेल तर प्रत्येकाने रोज किमान एक तास खेळासाठी दिलाच पाहिजे. शारीरिक शक्ती चांगली तर सर्वांगीण विकास नक्की.म्हणून किमान रोज एक तास खेळासाठी दिलाच पाहिजे

लेखक:- युवराज देवकर (युवा स्पोर्ट क्लब,पुणे)

संकलन:- राहूल शिंदे, विभागीय संपादक (9975114800)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध