Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
लासूर येथे गावठी कट्ट्यासह विना नंबरची मोटारसायकल आढळली...! चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल...!
लासूर येथे गावठी कट्ट्यासह विना नंबरची मोटारसायकल आढळली...! चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल...!
लासूर येथे धुमाकूळ घालणाऱ्या चार भामट्यांना तरुणांनी रात्रीला दबोचले
चोपडा (प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील लासूर गावात गेल्या एक महिन्यापासून अज्ञात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ माजवला होता. पुन्हा चोरीच्या उद्देशाने संशयीत गावात फिरत असल्याचे लक्षात आल्याने कोळी वाड्यातील तरूणांनी चार भामट्यांना धाडस करून रात्रीला दबोचले. तर बाकी साथीदार भामटे अंधाराचा फायदा घेवून पसार झाल्याची घटना दि. २ रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली
याबाबत माहिती अशी की, प्रवीण मगर पावरा (वय-२९), रमेश उर्फ बाबुराव साहेबराव पावरा (वय-२२), भगत मालसिंग पावरा (वय-२२), दिलीप पिंट्या पावरा (वय-१९) हे रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या गावात फिरत असल्याचे लक्षात आल्याने गावातील तरुणांनी चौघांना पकडून झाडाझडती घेतल्याने त्यांच्याजवळ एक गावठी कट्टा व विना नंबर प्लेटची मोटारसायकल इत्यादी मिळून आले. त्यांच्या सोबत असणारे काही भामटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
चोपडा ग्रामीण पोलिसात माहिती दिल्याने गावकऱ्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अभिजित पाटील, रितेश चौधरी, होमगार्ड रोशन बाविस्कर, श्रावण तेली यांच्या ताब्यात चोघांना दिले.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला चार भामट्यांविरुद्ध पोकॉ. अभिजित जगदीश पाटील यांच्या फिर्यादीनुसार आर्म अँक्ट – ३२५/ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. राजू श्रावण महाजन हे करीत आहे. लासूर येथील तरुणांनी हे धाड्सकार्य केल्यामुळे त्यांचे गावात कौतुक होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा