Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे उल्लेखनीय कार्य- कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान...!



जामनेर-प्रतिनिधी जामनेर पासून  जवळच असलेल्या  होळ हवेली फाटा येथील श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे गादीपती  श्री. श्याम चैतन्यजी महाराज यांनी आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून व साधकांच्या सहकार्याने आज ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर,जयश्री पाटील,डॉ, सुभाष पाटील, डॉ विनोद भोई,रुग्णवाहिका चालक,संजय विश्राम सुरवाडे, दत्ता पाटील, नितीन बनसोडे  शिपाई... राजेश नाईक, संतोष पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव केला.

मनोगत डॉ हर्षल चांदा व श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी व्यक्ती केला व डॉ जयश्री पाटील यांनी आभारी मानले गेल्या महिन्यात तालुक्यातील डॉक्टर, परिचारिक, महसूल व पोलिस विभागातील तब्बल ५० जणांचा तसेच पत्रकारांचाही कोविड योद्धा म्हणून सन्मान केला होता. 

त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन  सन्मानपत्र व शाल, श्रीफळ भेट देऊन गौरव केला. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात गरजू नागरिकांना 'एक घास प्रेमाचा...!' या कार्यक्रमाअंतर्गत अन्नधान्यासह किराणा किट भेट दिले. यामुळे अनेकांना जीवन जगण्यासाठी आधार झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड सेंटरला जाऊन आपल्या मधुर वाणीने रुग्णांना प्रवचनाद्वारे आधार दिला. महाराजांच्या या कार्यामुळे शासकीय यंत्रणेला मोलाचा हातभार लागून कोरोना महामारीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध