Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

चिंचपूर (बु) येथील घरकुल पात्र लाभार्थी प्रथम यादी जाहीर....



परंडा (राहूल शिंदे) दि.28 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील, प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजना प्रथम यादी मंजूर झाली असून ग्रामपंचायत चिंचपूर (बु)- सक्करवाडी-लंगोटवाडी पात्र लोकांनी उद्या दि.29 रोजी नमुना नंबर ८, आधारकार्ड कॉपी ,जॉबकार्ड मनरेगा, पासबुक कॉपी ग्रामपंचायत कार्यालयात आणून जमा करावे. विलंबाची जबाबदारी लाभार्थ्यांची असेल.

सदर सर्व घरकुल कामांचे स्वरुप पूर्णपणे मोफत आहे.घरकुल मंजूर करण्यासाठी किंवा कोणत्याही कागदपत्रांसाठी कोणी पैसे मागत असेल तर एकही रूपया देऊ नये. (ग्रामपंचायत कर भरण्याची मागणी केल्यास जेवढी रक्कम भरली आहे त्याची रीतसर पावती घ्या) असे आवाहन ग्रामपंचायत चिंचपूर(बु) चे प्रशासक जे.टी.वग्गे ,  ग्रामसेवक लोखंडे ए.ए यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास (घरकुल)योजना लाभार्थी यादी



1 टिप्पणी:

प्रसिद्ध