Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

शिंदखेडा येथील यादवराव सावंत यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड...!



शिंदखेडा (प्रतिनिधी) येथील कवी, लेखक तसेच पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेले यादवराव सावंत यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.परिषेच्या राष्ट्रीय आॅनलाईन सभेच त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याबाबतचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय संस्थापक कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी पाठविले आहे.
                      
शिंदखेडा येथील रहिवासी असलेले यादवराव सावंत यांनी गेल्या काळात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यांनी कविता,कथा,नाटक,एकपात्री नाटय लेखन विविध विषयांवर लेख यात भरिव लेखन केले आहे.अत्याचार हे तीन नाटकाचे पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी हयांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे.

सदरील नाटकास मृत्युंजय कार कै.शिवाजी सावंत पाच रुपये पुरस्कार मिळाला आहे,दिल्ली येथे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी. अब्दल कलाम, व राज्यपाल यांच्या  हस्ते दोनदा साहित्य रत्न पुरस्कार, हैदराबाद येथे अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली बाबत प्रतिभा सन्मान, मुंबई येथे डॉ.बी.आर, आंबे डकर शिक्षक गौरव, प्रसिद्ध कवी कै.जगदीश खेबुडकर पुरस्कार यासह विविध क्षेत्रात शंभर हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. अहिराणी भाषेतील चित्रपटाची निर्मिती केली आहे.त्यांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातील, शैक्षणिक, सामाजिक, विविध संघटना च्या पदाधिकारी व मित्र मंडळ कडून अभिनंदन होत आहे.लवकरच धुळे जिल्हा व शिंदखेडा, शिरपूर, धुळे,साक्री तालुक्यातील कार्यकारिणी ची निवड करण्यात येणार आहे.त्याबाबत धुळे जिल्ह्यातील नामवंत कवी, लेखक साहित्यिकांनी संपर्क साधावा असे जिल्हाध्यक्ष यादवराव सावंत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध