Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहरालगत असलेल्या अरुणावती नदीवरील पुलाचे कठडे तुटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे आसा प्रश्न नगरीक विचारत आहेत
शिरपूर शहरालगत असलेल्या अरुणावती नदीवरील पुलाचे कठडे तुटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे आसा प्रश्न नगरीक विचारत आहेत
शिरपूर: शहराजवळील दोन तर राज्य महामार्ग शिरपूर-शहादा महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरील कठडे,सुरक्षित गार्ड तुटलेले असल्याने वाहन धारकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी लहान पुलांवर कठडेच बसविलेले नसल्याने अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत़.
शिरपूर शहरालगत असलेल्या आमोदे गावाकडे जाणारा रस्त्यावरील अरूणावती नदीवर लहान पूल बांधण्यात आला आहे़.
जेव्हा-जेव्हा या नदीला महापूर आला,त्या-त्यावेळी या पूलाचे कठडे वाहून गेले आहेत़ गेल्या वर्षी देखील या नदीला महापूर आल्यामुळे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलावर वाहून गेलेले कठडे नव्याने बसविण्यात आलेले नाहीत़ मात्र याच पूलाशेजारी मोठा पूल करण्यात आल्यामुळे त्या पूलावरून देखील अधिक वर्दळ असते़ असे असले तरी या पूलाचे कठडे बसविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे़ लहान पूलावरून देखील नेहमीच वाहनांची वर्दळ असते़.
तसेच शहरातील खंडेराव मंदिराजवळील अरूणावती नदीवर उंटावद गावाकडे जाणारा पूलाचे देखील कठडे महापूरामुळे वाहन गेले आहेत़ गेल्या ९ आॅगस्टला आलेल्या पूरामुळे नेहमीप्रमाणे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलाला पुन्हा कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ याच नदीवर पुन्हा बाळदे गावाजवळ तिसरा पूल बांधण्यात आलेला आहे़ याही पूलाची परिस्थिती तशीच आहे़.
गेल्या वर्षी नदी-नाल्यांना आलेल्या महापूरामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील पुलाचा भराव, पुलाचे कठडे वाहून गेले तर रस्त्यांचे डांबरीकरण उखडून गेल्यामुळे त्या रस्त्यावर ये-जा करणे धोकेदायक ठरू लागले आहे़ शहरातील अरूणावती नदीला आलेल्या महापूरामुळे देखील शिरपूर-उंटावद गावाला जोडणारा पूलाच्या वरपर्यंत पाणी वाहिले होते, त्यामुळे या पुलाचा भराव वाहून गेला होता़.
त्यामुळे काही दिवस रहदारीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता़ मात्र नागरिकांचे हाल होवू लागल्यामुळे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी तातडीने तो भराव बुजून टाकल्यामुळे रहदारी पुर्ववत सुरू करण्यात आली होती़.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा