Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०
शेगाव तालुक्यातिल शेकडो तरुणांचा, स्वाभिमानीत प्रवेश....
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी तरुणांचे योगदान चळवळीमधे महत्तवाचे!प्रशांत डिक्कर.
शेगाव शहर (उमेश राजगुरे)दि.21शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हसते बिल्ला लाऊन तालुक्यातिल शेकडो तरुणांनी आपला प्रवेश निच्छित करुण घेतला. व संग्रामपुरचे योगेश वखारे यांची घरवापसी. सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे विदर्भातिल शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा शेक-यांच्या न्याय हक्कासाठी चळवळीमधे तरुणांचे योगदान फार महत्तवाचे आहे असे प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना सागितले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थाक अध्यक्ष मा. राजु शेट्टी यांच्या कार्यावर प्रेरित होउन ही चळवळ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा,विदर्भामधे प्रत्येक गावा गावात पोहचली आणी आंदोलनाच्या माध्यामातुन शेतकरी,कष्टकरी,कामगार व विद्यार्थांना न्याय मिळत आहे. यामधे तरुणांचे योगदान महत्तवाचे ठरले आहे. ज्या पध्दतने देशाच्या सरक्षणासाठी देशाच्या सिमेवर आर्मी काम करते त्याच पध्तने आपल्या शेतकरी बापाच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक गावात किसान पुत्र आर्मी म्हणुन काम करेल. गावा गावात तरुणांना एकत्रीत करुण आपल्या बापाच्या दुखाची जाणीव करुण देत चळवळी सहभागी करण्याचे काम अविरत चालु ठेवणार असल्याचे डिक्कर यांनी सांगितले. सत्कार भोजनालय शेगाव येथे आयोजित भेठकीत स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर,रोशन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित स्वाभिमानीचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या नेत्तृत्वार विश्वास ठेउन तरुणांनी प्रवेश घेतला या मधे सागर जमाव,श्रीकृष्ण उन्हाळे,मुकिंदा उन्हाळे,ऋषिकेश काळीगे,बाळूभाऊ फुंडकर,सदाशिव अजने. रवींद्र इंदोरे,प्रेम मानकर,विठठल उनाळे,रवी इंदोरे,सागर तायडे,सागर वानखडे सह शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा