Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
नीट परीक्षेच्या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थीनी युती संचेती चा गुण गौरव सोहळा संपन्न...!
नीट परीक्षेच्या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थीनी युती संचेती चा गुण गौरव सोहळा संपन्न...!
बळसाणे : कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जात असतात सतत अभ्यास करून होळनांथे गावातील युती संजयकुमार संचेती ह्या विद्यार्थीनी ने अभ्यासाची चिकाटी धरुन वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविले नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ६१० गुण संपादन केल्याचे कौतुक धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी शहरातील अक्षय रिसोर्ट येथे सत्कार प्रसंगी प्रतिपादन केले.
युती संचेती चे शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावी डॉक्टर म्हणून पुढील वाटचालीस रंधे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे नियमित अभ्यास करून जी मुले पुढे गेलेली आहेत तशा विद्यार्थ्यांना अनुभव देखील चांगलाच मिळत असतो आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपले पुढील आयुष्य उज्ज्वल बनवा असे आवाहन रंधे यांनी केले याप्रसंगी बळसाणे येथील मामा परिवार व शिरपूर च्या चोरडिया परिवाराने सत्कार केला यावेळी सुरेशचंदजी कोचर,प्रेमचंद चोरडिया,गौतम ओसवाल,राजेंद्र ओसवाल , उपेंद्र चोरडिया,संजय संचेती,ललित कोचर , बळसाण्या चे पत्रकार गणेश कोचर,पंकज बाफणा ,रोशन जैन ,गणेश जैन,निरज संचेती,निर्मल संचेती,राहुल कोचर,रोनक कोचर ,अनुज बाफणा आदी सत्कार प्रसंगी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा