Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

महिलांनो आत्मनिर्भर व स्वावलंबी बना...आरोग्यदूत मंजूषा चव्हाण.


   स्री शक्तीचा गौरव करणारा नवरात्रोत्सव यावर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणे साजरा होत आहे.तरुण गर्जना नवरात्रोत्सव स्पेशल ''जागर नवदुर्गाचा,सन्मान स्री शक्तीचा''  अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात आपल्या कर्तुत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नवदुर्गाचा परिचय आपण करून घेणार आहोत.

   आरोग्यविषयक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या उमरगा तालुका आरोग्यदूत मंजुषाताई चव्हाण यांचे माहेर अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली (आपेट) येथे आहे.त्यांचा विवाह आळंद तालुक्यातील आळंगा येथील डॉ.प्रेमनाथ चव्हाण यांच्याशी झाला. वडिलांची राजकीय पार्श्वभूमी होती तर पती वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले, लग्नानंतर ताईंनी आपला सुखी संसार सांभाळत समाजकार्याची दोरी आपल्या हाती घेतली व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी कधी मोफत तर कधी अत्यल्प पैशावर त्यांनी पतीच्या साथीने महिलांना उत्तम आरोग्य देण्याचे काम चालू केले.त्या योगा व निसर्गोपचार व आहार तज्ञ असून त्यांचे पती डॉ. प्रेमनाथ विश्वनाथ चव्हाण हे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

   सद्या त्या जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका सचिव व विश्व जन आरोग्य समितीच्या आरोग्य दुत पदावर कार्य करतात. तसेच गरजू महिलांना आधार व आरोग्य सेवा  देण्याचे काम करतात. संसारातून समाजकार्य करण्यासाठी वेळ काढून आपल्या छोट्या बाळाला घरी सोडून,पतींचे मन सांभाळून त्या सामाजिक कार्याला वेळ देतात,डॉक्टर पतीच्या मदतीने (वंध्यत्व)अपत्य नसलेल्या जोडप्यांना औषधोपचाराने कित्येक महिलांचे जीवन फुलविले, निसर्ग उपचार पद्धतीने मणक्यांच्या आजारावर पंचकर्म व अनेक रोगांवर सल्ला  उपचार देतात.

   त्या सामाजिक कार्यात अग्रेसर असून कोरोणाच्या महामारी मध्ये गोरगरिबांना अन्नधान्य व मास्क वाटप  केले आहे.  महिला मध्ये साक्षरता आरोग्य विषयक सल्ला व व्यसनमुक्ती, महिलांवरील अन्याय याबद्दल मार्गदर्शन करतात.

   जिजाऊ,सावित्री,अहिल्या यांच्या विचारांची ज्योत घेऊन सर्वसामान्य महिला पर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या घेऊन जात असतात. हजारो महिलांना स्वतःचे हक्क कर्तव्य याची जाणीव करून ते आपल्या व्याख्यानातून देत असतात. त्या सातत्याने सांगतात महिलांनी स्वतःच्या या पायावर उभे राहिले पाहिजे. नवीन गोष्टी नवीन कौशल्य सातत्याने शिकलं पाहिजे म्हणजेच महिलाने आत्मनिर्भर बनले पाहिजे.असा त्या सामाजिक संदेश सातत्याने त्यांच्या बोलण्यातून देत असतात.

   खरतर अभिमान वाटावा अशी गगनभरारी मंजुषाताई यांची आहे. कमी काळात हजारो व्यक्तींना हक्काची ताई वाटणारी. प्रत्येकाला सहकार्य ,मार्गदर्शन,प्रेरणा त्या सातत्याने देत असतात. त्यांच्या एकंदरीत सामाजिक क्षेत्रातील व आरोग्य क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ भूमिका पाहून खरंच जिजाऊ, सावित्री, अहिल्या यांच्या विचारांच्या त्या खऱ्या वारसदार शोभतात. पुढेही ही अनंतकाळ त्यांचे सामाजिक कार्य व्यापक स्वरूपाने विस्तारित होत राहील.

 नवरात्रोत्सव  चालू  आहे.. अशाच कणखरपणे त्यांनी सामाजिक क्षेत्रात दुर्गा बनून सर्वसामान्य महिलांसाठी लढा द्यावा. त्यांच्या न्यायासाठी लढा व्यापक स्वरूपात उभा करावा याच त्यांच्यासाठी खुप खुप सार्‍या शुभेच्छा....

विभागीय संपादक:- राहूल शिंदे,उस्मानाबाद (9975114800)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध