Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०
यशवंत विद्यालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी....!
सिंदखेड राजा (राजे शशिकांत जाधव)दि.२ येथून जवळ असलेल्या डिग्रस बुद्रुक येथील यशवंत माध्यमिक व कनिष्ठ कला महाविद्यालय महात्मा गांधी यांची जयंती तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जंजाळकर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सर्व नियमांचे पालन करून विद्यालयात जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक साबळे सर यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या या जीवनावर आपले विचार प्रगट केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जंजाळकर सर यांनी गांधीजी व शास्त्री यांच्या कार्याचे मोल सर्वांना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोपाल राजे जाधव सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन आनंदा वायाळ यांनी केले.
यावेळी श्री संतोष गवळी, दत्तात्रय देशमुख तसेच गावातील मान्यवर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा