Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

लंगोटवाडी येथे ''विश्व जन आरोग्य सेवा समिती'' व ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...!




परंडा (राहूल शिंदे ) दि.2 तालुक्यातील लंगोटवाडी हे अगदी मराठवाड्याच्या सरहद्दीवरील खेडेगाव आहे.गावची ओळख फक्त नकाशा पुरती मर्यादित होती , गावची खरी ओळख झाली सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत परंडा तालुक्यात सर्वप्रथम आल्यामुळे.

 देशात व राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.रक्ताची गरज देखील मोठ्या प्रमाणात लागत आहे त्या पार्श्वभूमीवर''विश्व जन आरोग्य सेवा समिती'' व ग्रामस्थ लंगोटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबीर घेण्यात आले. सकाळी 10 वाजता महात्मा गांधी यांच्या   प्रतिमेचे  पूजन विस्तार अधिकारी   वग्गे साहेब यांच्या हस्ते करून शिबिरास प्रारंभ झाला.या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.
  
त्याला प्रतिसाद देत,''विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या ''संस्थापक अध्यक्षा छायाताई भगत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात,गर्दी टाळत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

भगवंत रक्तपेढी बार्शी यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांचे अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. 
दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.सोशल डिश्टनशिंगचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे सोमनाथ कोकाटे यांनी बोलताना सांगितले.

राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय,उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले होते.

विश्व मराठा युवक सोशल मेडिया परंडा तालुका अध्यक्ष अक्षय काटे यांनी आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान करून एक सामजिक बांधिलकी जोपासली.
 
सर्व रक्तदाते सोशल डिश्टनसिंगचे पालन करून उपस्थितीत होते. सोशल डिस्टंसिंग सह अन्य उपाययोनांचेही समितीच्या  कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

ग्रामीण भागात लहान लहान रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली जावी.यामुळे गरजू रुग्णांची रक्ताच्या बाबतींत होणारी गैर सोय टळेल असे विस्तार अधिकारी वग्गे साहेब   यावेळी म्हणाले.

यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य शाखा धाराशिव, विश्व जन आरोग्य सेवा समितीचे परंडा तालुका आरोग्यदूत राहुल शिंदे, बार्शी तालुका आरोग्यदूत नितीन मोहीते, बार्शी शहर आरोग्यदूत राहुल वाणी,विश्व मराठा संघ परंडा तालुकाअध्यक्ष रावसाहेब काळे,जेकटेवाडीचे पोलीस पाटील रवींद्र तांबे,अक्षय काटे, अंगद कासारे, तानाजी कासारे,आकाश गुटाळ, सचिन लेकूरवाळे,सिद्धेश्वर चव्हाण,दशरथ चव्हाण आदी उपस्थितीत होते.प्रत्येक रक्तदात्यास विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध