Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०
देवपिंप्री येथील भाजी-पाला विक्रेत्याचा मुलगा होणार डॉक्टर..!
जामनेर: प्रतिनिधी देवपिंप्री ता. जामनेर येथील रहीवाशी व आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे भगवान धोंडु पाटील यांचा मुलगा ऋषीकेश याला नुकत्याच जाहीर झालेल्या निटच्या परीक्षेमधे ७०० पैकी ६४५ गुण मिळाले,त्याची आता डॉक्टर होण्याची ईच्छा आहे.
तल्लख बुध्दी असल्याचे ओळखुन १२ वी नंतर निटची परीक्षा देण्याचे ठरवीले पण कोटा (राजस्थान) साठी जवळ पैसा नव्हता,मात्र गांवातील राजकीय कार्यकर्ते तुकाराम निकम यांनी हि समस्या माजी मंत्री गिरीश महाजनांना सांगीतली,त्यांनी लागलीच आवश्यक पैशांसह त्याची कोटा पाठविण्याची व्यवस्था केली होती,आणी वडीलांनिही काही पैशांची तरतुद कर्ज घेऊन केली होती.
गरीबीची परीस्थिती असल्याने काही शिक्षण मामाकडे झाले,५ वीत नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे ६वी. ते १२वी पर्यंत चे शिक्षण नवोदय विद्यालय कन्नड औरंगाबाद) येथे झाले.१०वी.ला शेकडा ९४ टक्के गुण तर १२वी ला शेकडा ९५ टक्के गुण मिळविले. निटच्या पहील्या प्रयत्नात ४२३ गुण मिळाले होते,
त्यावर समाधान न झाल्याने ऋषीकेषने पुन्हा बसण्याचा निर्णय घेतला आणी यावेळी मात्र त्याला ७०० पैकी एकुण ६४५ गुण प्राप्त झाले.घरात कुठलीही शिक्षणाची व्यवस्था नसतांना इतके मोठं यश संपादन करणे ही अभिमानास्पद बाब आहे. आई ने दुसऱ्याच्या शेतात राबून ऋषिकेश च्या शिक्षणाला मदत केली.ऋषिकेश हा ड्रॉक्टर होऊन समाजातील गोर गरीब,वंचित अशांची सेवा करण्याचे मानस त्याने व्यक्त केले.आ. गिरीश महाजन करणार शिक्षणाचा खर्च देवपिंप्री येथील ऋषिकेश पाटील याला है यश मिळाल्यानंतर त्याने आ. महाजन यांना सविस्तर माहिती दिली.
महाजन यांनी त्याला घरी बोलवून त्यांचा सत्कार केला व यापुढील पूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वतः करेल असे आश्वासन सुद्धा यावेळी ऋषिकेश चे वडील भगवान पाटील यांना दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा