Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०
आ.सावंत,खा.निंबाळकर यांचा अतिवृष्टी पाहणी दौरा व वचनपूर्ती.
परंडा (राहूल शिंदे) दि.20 परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील आवरपिंपरी, देवगाव (खुर्द), भोत्रा, कंडारी येथील शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.प्रा.तानाजीराव सावंत,माजी आ.ज्ञानेश्वर पाटील यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिका-यांना तातडीने नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्याला पुन्हा उभा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संकटकाळी महाराष्ट्र शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, तसेच पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे, विहिरी, पशुधन, पोल्ट्री फार्म किंवा अन्य शेतीपूरक उद्योग, घरे आदींचे पंचनामे व याचबरोबर अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेले बंधारे, रस्ते-ओढ्यावरील पुलाच्या दुरुस्तीची कामे, पीक पंचनामे तातडीनं करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर माजी मृद व जलसंधारण मंत्री आ.प्रा.तानाजीराव सावंत यांनी सन- 2019 लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिलेले वचन आनाळा साठवण तलावात पाणी सोडून पूर्ण केले.
सिना-कोळेगाव प्रकल्प भरून वाहत असताना वाहून जाणारे पाणी आनाळा सिंचन प्रकल्पात सोडण्यात येणार होते. केवळ विज पुरवठा नसल्याने कित्येक दिवसापासून हि योजना बंद होती. पाणी सोडल्याने परिसरातील पाच ते सहा गावांचा पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटनार होता.
पाणी सोडण्याकरीता जसा सिना-कोळेगाव प्रकल्प भरला तसे प्रा.सावंत साहेबांच्या सूचनेनुसार जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि.प.सदस्य दत्ता आण्णा साळुंखे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर,भैरवनाथ कारखान्याची चिफ इंजिनिअर व पूर्ण स्टाफ दुरुस्ती कामासाठी लावला होता. आज सिना कोळेगाव पंप हाऊस येथे स्वतःहजर राहून काम पाहून पाणी सोडण्यात आले. आनाळा साठवण तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे खासदार, आमदार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी माजी आ.ज्ञानेश्वर पाटील,जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, संजय नाना गाढवे, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके सर, सुभाष सद्दीवाल, परंडा शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव व संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा