Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांना आव्हान व सरकारकडे मागणी...!
तांडा कुंडाणे(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पन्न घेतले त्याला आता कुठेतरी थोडा भाव मिळू लागला असतानाच मधेच केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. ही निर्यात बंदी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक होती. पण तरीही कांद्याचे वाढते भाव सरकार आटोक्यात आणू शकले नाही. कारण बहुतेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नवीन लागवडीचा कांदा खराब झाला व जुन्या कांद्याच्या अनेक चाळी सडून खराब झाल्या.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला असून उत्पन्नात मोठी घट झाली आहे. थोडाफार कांदा आज शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आणि आज कुठे त्या कांद्याला थोडा भाव वाढत असताना सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय घेत परदेशातून कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. आणि कृत्रिम पद्धतीने कांद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच मागे कांद्याचे भाव नियंत्रणात रहावे म्हणून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आणि त्यांना ही दबावतंत्र वापरून कांदा भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाने टार्गेट केले पण कांदाच शिल्लक नसल्यामुळे कांद्याच्या वाढत्या भावांना रोखणे सरकारला आता शक्य नाही. शेतकऱ्यांनी 4-5 हजार रुपये किलो दराने कांदा बियाणे घेतले. त्यावेळी कांदे बियाण्यावर व त्याच्या भावावर कोणतेही निर्बंध लादण्यात आले नाही त्यावेळी महागाई सरकारला दिसली नाही.आणि आज शेतकऱ्यांच्या खिशात थोडा पैसा येऊ लागला तर लगेच सरकारने निर्यात बंदी आणि आयात सुरू केली. ही सर्व पार्श्वभूमी पाहता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा योग्य वेळी योग्य दरातच विकावा. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे हे वेळोवेळी शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांना आधार देण्याचे काम करत आहेत तसेच धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे व कांदा उत्पादक शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष जयदीप पवार यांनीदेखील धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घाबरून न जाता टप्प्याटप्प्याने वेळोवेळी कांदा काढण्याचे आव्हान केले आहे. कांद्या विषयी येणाऱ्या समस्या आणि माहितीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांनी परिस्थिती हाताळावी असे आवाहन संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या शेतकरी विरोधी निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याबद्दल जिल्हाध्यक्ष संजय भदाणेव महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष जयदीप पवार यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. आणि सरकार कांद्याचे दर पाडण्यासाठी जास्त हस्तक्षेप करू लागलं तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. व पावसामुळे व अतिवृष्टीमुळे कांद्याचे टाकलेले रोप व कांदा लागवड यांचे नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करा अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या पेपर मध्ये आपण प्रकाशित केला त्याबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवा