Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

बंधन बँकेच्या वसुलीचे सव्वा लाख रुपये रस्त्यात लुटल्याचा बहाना उघड झाल्याने वसुली कर्मचारी झाला गजाआड...!



जामनेर:प्रतिनिधी बँकेच्या वसुलीचे आपल्या जवळ असलेल्या सव्वा लाख रूपये रस्त्यात मला मारहाण करून लुटण्यात आल्याचा बहाणा केला. 

परंतु पोलीसांच्या नजरेतुन तो सुटला नाही, परीणामी बंधन बँकेचा वसुली कर्मचारी हितेश रामेश्वर देशमुख रा.पारळ ता. भोकरदन जि.जालना याला गजाआड व्हावे लागले.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गारखेडा ता.जामनेर येथुन जामनेरकडे बंधन बँकेच्या कर्जधारकाकडुन वसुलीचे सव्वालाख रूपयेआणत असतांना भुसावळ-जामनेर रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी माझा पाठलाग करून दुचाकीला लाथ मारून खाली पाडले,आणी माझ्या जवळचे १ लाख २५ हजार रूपये चोरून नेले असे सांगत पोलीसात फिर्याद दिली.सदर घटना आज दुपारी साडेतीन-चार वाजता घडल्याचे सांगीतले. 

त्यावरून लागलीच पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांनी रस्ता लुटीचिच तक्रार असल्याने सोबत सहायक फौजदार किशोर पाटील,पो कॉ विलास चव्हाण,चंदु पाटील,मनोज धनगर,अमोल वंजारी व गृहरक्षकदलाचे राहुल शिंदे,स्वप्नील चौधरी असा लवाजमा घेऊन घटनास्थळी पोहचले,घटना कोठे-कशी घडली याविषयी पोलीसांचे प्रश्न सुरू झाले,आणी तीथेच बिंग फुटले. 

त्यावेळी पोलीसांनी मग पोलीसी खाक्या दाखविताच गारखेड्याजवळील रस्त्याच्या कडेला लपविलेले पैसे काढुन दिले,आणी कंपनीचे लॅप-टॉप,बॅग आदी साहीत्य एमआयडिसी जवळ ठेवले होते,तेही पोलीसांना संशयीत आरोपी हितेश देशमुख याने काढुन दिले.

त्यामुळे रस्तालुट होऊन सव्वालाख रूपयांवर खोट्या बहाण्याने डल्ला मारू पहाणारा प्रकार पोलीसांच्या कसुन चौकशीमुळे उघड होऊन भादवी कलम १८२ नुसार गुन्हा दाखल होऊन त्याला गजाआड व्हावे लागले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध