Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

पिंप्रीगवाळी येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने भीतीचे वातावरण



मोताळा तालुका प्रतिनिधी दिनांक 01ऑक्टोबर 2020रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार  पिंप्रीगवाळी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा  येथील 56 वर्षीय पुरुष व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

गावातील ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरजाळील परिसर सील करण्याचं काम अगदी युद्धपातळीवर सुरु आहे. 
   
यामध्ये गावातील  ग्रामपंचायत सचिव इतर ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, तलाठी, तसेच  स्टाक फोर्स कोरोना स्वयंसेवक यांचेसह सदर व्यक्तीच्या घराजवळील परिसर सील करून गावात जनजागृती करण्याचं काम करीत आहे. 
    
या अगोदर ऑगस्ट महिन्यात एक 35 वर्षीय पुरुष व 16 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह निघाली होतें. त्यांचेवर तात्काळ उपचार करण्यात आल्याने सदर दोनीही व्यक्ती अगदी सुखरूप घरी आले व ठणठणीत बरे झाले.त्यामुळे गावातील नागरिकांनी सुटकेचा स्वास सोडला होता परंतु  तब्बल एका महिन्यानंतर आज अजुन गावातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे. 

सदर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला आपलं कुटुंब आपली जबाबदारी या सरकारी धोरणानुसार स्वतःच्या घरातच कोरंटाईन करून उपचार देण्यात येत आहे.तसेच त्यांचे संपर्कात असलेल्या लोकांची तपासणीसाठी माहिती गोळा करण्यात येत आहे. तसेच फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध