Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी वेताळे यांची बदली करण्याची मागणी...!
शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी वेताळे यांची बदली करण्याची मागणी...!
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी वेताळे यांची बदली करण्याची मागणी चक्क ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी जे.के. वेताळे हे मनमानी कारभार करीत आहेत.
सदर ग्राम विकास अधिकारी त्यांना जेव्हा वाटते तेव्हा ग्रामपंचायतीला येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्र देत नाही म्हणून गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सदर ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये नेहमी वाद होत राहतात.
सदर ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करत असून ग्रामस्थांमध्ये यांच्या कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजगी असून सदर ग्राम विकास अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी .अन्यथा येणारा आठ दिवसात आम्ही खालील सही करणार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे.
सदर तक्रार होती गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे.तसेच या तक्रारीची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांनाही देण्यात आले आहेत. या तक्रारीच्या प्रतीवर ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाटील, रवींद्र तवर अनिल मराठे , सौ.संगीताबाई भरत मराठे, भटु शिरसाठ , सौ.रेखाबाई डोंगर कोळी,सौ.अलकाबाई मधुकर शिरसाठ,सौ.अनिताबाई शाहू सोनवणे ,मन्यार जुबैर समद, शाम भील आदींच्या सह्या आहेत .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा