Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
दोन सख्या बहिणीचे घरातून पलायन केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील आमोदे गावात घडली..!
दोन सख्या बहिणीचे घरातून पलायन केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील आमोदे गावात घडली..!
शिरपूर (प्रतिनिधी)दोन सख्या बहिणीचे घरातून पलायन केल्याची घटना तालुक्यातील आमोदे गावात घडली आहे. घरातील कोणाला काही एक न सांगता दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास चिठ्ठी लिहून घरातून निघून गेल्या आहेत याबाबत वडीलांच्या माहिती वरून शहर पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे.
दोघी सख्या बहिणी असून एक अल्पवयीन आहे.
सविस्तर असे की,शिरपूर शहरालगत असलेल्या आमोदे गावातून एक २२ वर्षीय सज्ञान व दुसरी लहान १५-१६ वर्षाची अल्पवयीन अशा सख्या दोन बहिणी दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घरात “आम्ही घरातून जात आहोत,कुठे जात आहोत, कुठे राहणार,काय करणार माहीत नाही व एक दोन महिन्यांनी घरी परत येऊ त्यामुळे शोध घेऊ नका स्वारी”अशी चिठ्ठी लिहून निघून गेल्या आहेत.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा