Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना शेतकरी क्रांती संघटना



शेगाव (प्रतिनिधी उमेश राजगुरे)
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना शेतकरी क्रांती संघटना यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दिनांक 13 ऑक्टोंबर ला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे 

की शेतकऱ्यांना वन्यजीव व प्राण्यांपासून होत असलेल्या नुकसान पासून
संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कुंपण शेतीकरिता अनुदान मिळणे बाबत महाराष्ट्र शासनाने शेतकरी क्रांती संघटनेच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्या त्या असा की शेतकऱ्यांना कुंपण शेती साठी अनुदान योजना लागू करण्याबाबत,महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाचा विमा तात्काळ मंजूर करावा, सर्व हरभरा बियाणं करिता शासनाने त्वरित सबसिडी लागू करावी, सर्वांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, शेत रस्ते त्वरित मंजूर करण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजानन किसन बिलेवार, श्री ज्ञानदेवराव कराळे, रमेश बावस्कार, विलासराव शेळके, अनिल भाऊ शेळके, तालुकाध्यक्ष भास्करराव शेळके, शहराध्यक्ष विशाल तायडे, वसंता महादेव तराडे, व असंख्य शेतकरी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध