Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

पांढरेवाडी येथील निम्नखैरी प्रकल्प तुडूंब,माजी आ.राहूल मोटे यांच्या हस्ते जलपूजन ! ! !




परंडा (राहुल शिंदे) दि.3 तालुक्यातील पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्प 100% तुडूंब भरून सांडव्यावरून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

गेल्या काही दिवसातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्वच धरणात पाणी साठा मोठय़ाप्रमाणात झाला आहे.यावर्षी अगदी जून पासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व नदी,नाले,ओढे, विहिरी,तलाव पाण्याने भरलेले आहेत.

पांढरेवाडी येथील प्रकल्पात सुमारे 10.56 दशलक्ष घन मी इतका पाणी साठा झाला आहे. याचा लाभ पांढरेवाडी,चिंचपूर बु.,माणिकनगर, शेळगाव, सक्करवाडी, लंगोटवाडी या गावांना मोठ्याप्रमाणात होत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत आहे. या प्रकल्पातील पाणी साठा पाहण्यासाठी परिसरातील नागरीक गर्दी करत आहेत यामुळे एकाध्या पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहे.

आज भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे माजी आ.राहूल मोटे  यांनी तलावातील पाणी साठय़ाचे जलपूजन केले व बळीराजाला सदैव सुखी व आनंदी ठेवण्याची प्रार्थना केली.

यावेळी नवनाथ जगताप,माजी पं.स सदस्य दिपक भांडवलकर, बापु मिस्किन,भाऊसाहेब खरसडे , माजी पं.स सभापती आण्णा भोगिल,दत्ता पाटिल धनंजय पाटील,कुडलिक गायकवाड , माजी पं.स सदस्य वसंत पवार,बाळु भरणे,माजी सरपंच भाऊसाहेब टिटवे,माजी सरपंच बाळासो शेवाळे, विजय शेवाळे, सूर्यकांत औताडे,योगेश काळे, अमोल गुड , पिंटु दैन, कैलास दैन, औदुंबर जगताप , सनी जगताप , अभिजित जगताप, विष्णु शेवाळे,बापु मगर,डॉ.गोरख कदम, शरद पवार, सुभाष दैन व  शेळगांव, पांढरेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध