Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०
काळेवाडी तलावाला तडे,पाण्याचा विसर्ग सुरू...
परंडा (राहूल शिंदे) दि.14 तालुक्यातील काळेवाडी तलाव धोकादायक झाला आहे. तलावाच्या वरच्या बाजूस तलावाच्या लांबीस समांतर भेगा गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर लागलीच उपाय योजना सुरू केल्या आहेत. साधारण 200 मी. लांबीमध्ये भरावा खचत आहे.
सांडव्या मध्ये पोकलंडच्या साह्याने फोडून पाणी पातळी कमी करण्यात येत आहे. परंतु खडक असल्याने खोल चर जात नाही. त्यामुळे ब्रेकर लावून खोल चर घेण्यात येत आहे.
पाईप टाकून पाणी कमी करण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.तसेच जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने खचलेल्या ठिकाणी भरावा टाकण्यात येत आहे. तलावाची पाणी साठवण 200 सघमी आहे. सध्या 3 फूट पाणी पातळी कमी केलेली आहे. अजून 4 फूट पाणी पातळी कमी झाल्यास धोका कमी होईल. तसेच भरावाच्या खालच्या बाजूस 4 हायवा च्या साह्याने माती व मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. कार्यकारी अभियंता,तहसीलदार,बीडीओ उपअभियंता सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत.
याबाबत पंचायत समिती सभापती सतीष दैन यांनी आ.प्रा.तानाजी सावंत यांना माहिती दिली होती व ते संपर्कात असून वेळोवेळी माहिती घेत आहेत.त्यांच्या सूचनेनुसारच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहे. या तलावातील पाणी जाण्याचा मार्ग पूर्ण झाल्यास तलाव फुटण्याचा धोका कमी होणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणेकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अण्णासाहेब कदम यांनी दिली.
याअगोदर काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील खंडेश्वोरवाडी प्रकल्पाची अवस्था देखील अशीच झाली होती.मोठय़ाप्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
निकृष्टदर्जाच्या कामकाजामुळे मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.तरी संबंधित जबाबदार व्यक्तीवर कडक करवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रसंग घडणार नाहीत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा