Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
रक्तदान करून डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची, जयंती साजरी! ! !
उस्मानाबाद (राहूल शिंदे ) दि.15जिल्हा परिषदच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले,प्रथम माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले,प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत यांनी पुष्पमाला अर्पण करून रक्तदानाला सुरूवात केली.
कोविड-19 च्या काळात सध्या रक्ताचा तुटवडा मोठया प्रमाणावर भासत आहे.प्रसुत महिला,इतर आजारी व्यक्तींना रक्ताअभावी आपला जीव गमविण्याचा धोका निर्माण झाला आहे, तरी आपले अमुल्य रक्तदान करून मृत्यूशी झुंज देत असलेल्या रूग्णांना जीवदान देण्यासाठी व त्यांचे जीवनात हास्य फुलविण्याच्या हेतूने जिल्हाभरातील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच इच्छुक विद्यार्थ्यी व नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.प्रहार शिक्षक संघटनेचा रक्तदानात सक्रिय सहभाग होता.
त्यानुसार कोविड 19 च्या नियमाचे पालन करत प्रहारच्या निष्ठावंत शिक्षक यांनी हिरीरीने सहभाग नोंदवत कोरोनाचे सावट असतानाही जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या विनंतीला मान देत 10 शिक्षकांनी स्वच्छेने रक्तदान केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, जिल्हा समन्वयक दत्तात्रय पुरी,कार्याध्यक्ष विशाल अंधारे , उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख धम्मदिप सवाई, सुशिलकुमार पौळ,हरी परदेशी,रामभाऊ गांगर्डे, सुशील लगदिवे आदींनी रक्तदान केले.यावेळी प्रहार जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत माने,महिला आघाडी प्रमुख सुषमा सांगळे वनवे मॅडम आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा