Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

किशोर गटकळ यांची, भुम तालुका विश्वजनआरोग्य समन्वयक पदी नियुक्ती.....


परंडा (राहूल शिंदे) दि.15 तालुक्यातील खंडेश्वर मध्यम प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी विश्वजन आरोग्य सेवा समितीचे धाराशिव चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कोकाटे आले असता त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील आंबी ता.भूम येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे किशोर श्रीरंग गटकळ यांची विश्वजन आरोग्यसेवा समितीच्या संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुका विश्वजन आरोग्यसेवा समितीच्या तालुका समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र  सोमनाथ  कोकाटे जिल्हा समन्वयक धाराशिव यांच्या हस्ते देण्यात आले .  

यावेळी जी.ए.उबाळे .शाखा अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग क्र.4 परंडा, रावसाहेब काळे तालुकाध्यक्ष विश्व मराठा संघ परंडा, रविंद्र तांबे पोलीस पाटील जेकटेवाडी तथा सामाजिक कार्यकर्ते, गोविंद बोंद्रे,पोपट केसकर यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध