Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

सत्रासेन वन विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.



सत्रसेन तालुका चोपडा येथे वन विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. 

नामशेष होत चाललेल्या वन्य 
पशु पक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. वन विभागाच्या वतीने दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान 'वन्यजीव सप्ताह' साजरा केला जातो. 

याकाळात वन्यजीवां विषयी निबंध,चित्रकला स्पर्धा घेणे,वन्यजीव तज्ञ-पक्षिमित्र यांचे व्याख्यान आयोजित करणे, वन्यजीव विषयी माहिती व चित्र प्रदर्शन दाखवणे,पक्षी निरीक्षण करणे, वन्यजीवांचे स्लाईड शो द्वारे माहिती देणे,आठवडे बाजारात किंवा महत्त्वाच्या चौकात गर्दीच्या ठिकाणी, शाळेत मुलांना,वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनजागृती करणे शहरात,गावांमध्ये रॅलीचे आयोजन करणे अशा प्रकारे प्रत्येक वर्षी वन्यजीव कार्यक्रम साजरा केला जातो त्याचे महत्त्व विभागाचे वतीने लोकांना पटवून दिले जाते.
जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ रोगामुळे यावर्षी मात्र वन विभागाच्या वतीने शाळा बंद असल्यामुळे निबंध स्पर्धा घेता आल्या नाहीत व गर्दीच्या ठिकाणी किंवा चौकात गर्दी गोळा करून कार्यक्रम सादर करणे बंधनकारक असल्यामुळे यावर्षी मात्र वन विभागाच्या वतीने साध्या पद्धतीने वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच वनविभागाकडून सोशलडिस्टन चे नियम पाळून कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रम साजरा करण्यासाठी उपस्थित वनविभागाचे वनपाल श्री.एस.बारेला,वनरक्षक श्री. एस.आर.भोई,श्री.व्ही.सोनवणे, श्रीमती.एस.भालेराव, श्रीमती.एस. एस.भोई,कु.आर.एस.झटाले,कु.आर.बारेलातसेच सत्रासेन गावाचे सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. वनपाल सत्रासेन यांच्याकडून ग्रामस्थांना वन्यजीवांचे तसेच पर्यावरणाचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध