Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

उमरगा बलात्कार प्रकरणातील आरोपीला, फाशीच द्या.- विश्व मराठा संघ...


उमरगा (राहूल शिंदे) दि.8 विश्व मराठा संघ उमरगा लोहारा यांच्यावतीने आज पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व उपविभागीय पोलिस अधिकारी उदमले मॅडम यांना लक्ष्मी पाटी येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी यासाठी विश्व मराठा संघ उमरगा - लोहारा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की ,देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तेथील एका महिलेवर चौघांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सदर महिला वीटभट्टी मजूर असून, या महिलेवर वीटभट्टी मालकासह चौघांनी अत्याचार केला असल्याची हकीकत पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे. दरम्यान सर्व आरोपी फरार असून, या सर्व आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.तपास लवकर लावून जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी आरोपींना फाशीच देऊन पीडित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी विश्व मराठा संघ तालुकाध्यक्ष बाबा पवार
सागर भोसले, रणजीत बिराजदार ,सुरज भोसले, अभिषेक वडदरे, गणेश शिंदे नितीन नागरे विशाल हंदरगे मंगेश भोसले योगेश जाधव तुकाराम शिंदे अनिकेत घुगे सिद्धांत पोतदार.अदि पदाधिकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध