Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
परतीच्या पाऊसाने मोठे नुकसान, शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी खासदारांनी काढला पाण्यातून मार्ग ! ! !
परतीच्या पाऊसाने मोठे नुकसान, शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी खासदारांनी काढला पाण्यातून मार्ग ! ! !
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.15 उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने लहान मोठे तलाव 100% भरले आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या लहानमोठ्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे.
सोयाबीन,मका पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. तसेच नदीकाठच्या शेतातील उभी पिके व जमिनीतील माती वाहून गेली आहे.
तुळजापूर तालुक्यातील कात्री रोड,अपसिंगा येथिल ऋषिकेश पाटील यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरे वाहून गेली आहेत. या ठिकाणी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट देऊन, नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणीकरण्यासाठी चिकल तुडवत,पाण्यातून पायी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांला धीर दिला.
तसेच जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, शेतकरी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी तात्काळ आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणेबाबत मा.जिल्हाधिकारी दिवेगावकर यांना, सर्व तहसीलदार तसेच सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. वैद्यकीय व आपत्कालीन मदतीसाठी शिवसेना तालुका प्रमुख,गावचे सरपंच, शिवसेना शाखाप्रमुख, तसेच खासदार कार्यालयास संपर्क करावा असे आवाहन खा.निंबाळकर यांनी केले आहे.संपर्क साधण्यासाठी
बालाजी सावंत 9689663740
समाधान शिंदे 9011650021
उदय माकोडे 9561656576
औसा विधानसभा मुन्ना शेख 9960466179
ऑफिस संपर्क 02472223777
शेतकऱ्यांचावाली...पाण्याने वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संसाराला पाण्यातुनच वाट काढीत त्यांचे दुःखद अश्रु पुसण्यासाठी गेलेले एकमेव तळमळीचे लोकप्रिय खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर सलाम आपल्या कार्याला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा