Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे आरक्षण व विविध मागण्यांसाठी तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले..!
भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे आरक्षण व विविध मागण्यांसाठी तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले..!
निवेदन देताना जयेश भोई (भोई समाज युवा मंच जळगाव जिल्हा संघटक प्रमुख) मयुर भोई (भोई समाज युवा मंच तालुका अध्यक्ष)गौरव भोई (भोई समाज युवा मंच तालुका सचिव) भोई समाज हा अत्यंत गरीब समाज असुन महाराष्ट्रातील समाजाची लोकसंख्या ४०लाखाच्या जवळपास आहे.
समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भोई समाजाला आरक्षण फार गरज आहे.
भोई समाजातील ९० % लोक पोटापाण्यासाठि गावोगावी भटकंती करीत असता आणि या समाजाला संविधान तरतूदीनुसार आरक्षणाचा सहारा मिळाल्यास भोई समाजाला न्याय मिळु शकेल १९७४ भोई समाजाला भटक्या विमुक्त जातीचे तुटपुंजे आरक्षण देण्यात आले परंतु त्यातही ३५ जातींचा समावेश करण्यात आला भोई समाज वर अन्याय झाला असुन या समाजाला मुख्यप्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे.तरी या मागण्या गांभिर्याने व विचार करावा.
प्रमुख मागण्या
१) महाराष्ट्रातील भोई समाजाला अनुसूचित जाती अथवा जमातीच्या एस सी किंवा एस टी च्या सवलती मिळाव्यात
२)तलाव ठेके फक्त भोई समाजालाच देण्यात यावे
३) महाराष्ट्रातील मत्स्योदयोग विकास मंडळाचे नाव मत्स्योसहार करावे.
४) भोई समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय होस्टेलची व्यवस्था करण्यात यावी. आणि सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी
५) फ्रुटपथावर बसुन चणे फुटाणे विकणारे समाज बांधवांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे.
६) धरणामुळे डांगरवाडी धारक विस्थापित झाल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करुन शासनाकडून उदरनिर्वाह करीता भुमीहीन प्रमाणे कमीत कमी ५ एकर सरकारी जमीन द्यावी
७) भोई समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी उद्योग व्यवसायात कर्ज व सबसिडीच्या योजना आणाव्यात.
८) भोई समाजातील मुलींना १० वी पर्यंत शिक्षणाचा मोफत लाभ मिळावा ....
उपस्थित.
किरण भोई . सचिन भोई. सागर भोई. नंदकिशोर भोई.प्रविण भोई. चेतन भोई .विशाल भोई . विनायक भोई विशाल प्रकाश भोई रवि भोई हिलाल भोई कोमल पाटील गणेश बारी अश्विन चौधरी योगेश चौधरी .व भोई समाज युवा मंच पारोळा तालुका व जळगाव जिल्हा संघटना पदाधिकारी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा