Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

धनगर समाज एस.टी अंमलबजावणीसाठी, उस्मानाबाद येथे रास्तारोखो मोर्चा झाला.


उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.6 येथे आज धनगर समाजाचा,धनगर एस.टी अंमलबजावणी साठी रस्ता रोको मोर्चा पार पडला.यावेळी उस्मानाबाद शहरातील मुख्य शिवाजी चौक येथे धनगर समाज बांधवांनी जवळपास 1 तास रस्ता बंद करून धनगर आरक्षणाची जोरदारपणे मागणी केली व पूर्ण शहर घोषणांनी दणाणून सोडले.

लोणावळा येथे धनगर आरक्षण लढा समन्वय समितीच्या बैठकी मध्ये 16 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले आहे परंतु उस्मानाबाद येथील मोर्चाचे नियोजन अगोदरच झाल्यामुळे आज हा मोर्चा झाला.

मोर्चा आयोजक अँड.कोळेकर,सचिन शेंडगे यांनी सांगितले की 16 तारखेला उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

आजच्या मोर्चासाठी सुरेश कांबळे,गणेश हाके या नेत्यांसोबतच हजारो समाज बांधव उपस्थित होते. मोर्चासाठी आ.गोपीचंद पडळकर उशीर झाल्यामुळे वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत.

फलक,ढोल,बॅनर यामुळे संपूर्ण उस्मानाबाद शहरात आज एक वेगळंच उत्स्फूर्त वातावरण बघायला मिळालं.या मोर्चाचे अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन धनगर आरक्षण लढा समन्वय समितीचे राज्यस्तरीय सदस्य,सचिन शेंडगे, अँड.कोळेकर यांच्यासह इतर स्थानिक समाज बांधवांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध