Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
ग्रा.पं. सदस्य महेश कोरवी यांचे ग्रामपंचायत कडून लेखी पत्र घेऊन उपोषण मागे घेण्यात आले...!
ग्रा.पं. सदस्य महेश कोरवी यांचे ग्रामपंचायत कडून लेखी पत्र घेऊन उपोषण मागे घेण्यात आले...!
कोल्हापूर प्रतिनिधी: हुमायून नदाफ
मौजे रेंदाळ ता.हातकणंगले मधील मानेनगर वसाहत मधील विविध विकास कामे, खंडित पाणीपुरवठा, कर्मचारी थकीत पगार, फंड व नवीन भरतीबाबत दि .० ९/ १०/ २०२० रोजी मानेनगर वसाहतमध्ये ग्रा.पं.सदस्य महेश कोरवी आमरण उपोषणास बसले होते.
आज लोकनियुक्त सरपंच विजय माळी व माजी जिल्हापरिषद सदस्य विलासराव खानविलकर यांच्या मदतीने हे उपोषण मागे घेण्यात आले.
तसेच ग्रामपंचायतकडून खालील मुद्दे १. स्वच्छता बाबत झाडू नोकरामार्फत स्वच्छता चालू आहे. वेळोवेळी JCB ने आवश्यक ठिकाणी निचरा चर मारून सांडपाणी निचरा केला आहे. 2. पावसाळ्याचे दिवस असल्याने पावडर धुराळणेत आली नाही पाऊस बंद झालेनंतर फौलीडॉल पावडर धुराळणेत येईल. 3.भागामध्ये व गावामध्ये फौगिंग लवकरात लवकर केले जाईल.4. डुकराबाबत श्री.अजित कोरवी रेंदाळ यांना डुकरांची विल्हेवाट लावणेबाबत सूचना दिली आहे.5. पाऊस बंद झालेनंतर रस्ते डांबरीकरणाचे काम केले जाईल. 6.कोरोना संसर्गामुळे वसुली बंद असलेने निधी उपलब्धनुसार नोकर पगार देणेत येत आहे. सध्या झाडू नोकरांचा मे अखेर व पाणीपुरवठा कर्मचारी जुलै अखेर पगार देणेत आला आहे.
7. वीजपुरवठा खंडित झालेने अथवा तांत्रिक बाबीमुळे पाणीपुरवठा अवेळी होत आहे . अन्यथा पाणीपुरवठा साधारण ४ ते ५ व्या दिवशी होतो. वरील बाबीचा विचार करता सदर उपोषण लेखी पत्र घेऊन स्थगिती करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनिल हासुरे ,एम.बी.पाटील , माजी उपसरपंच अभिषेक पाटील , ग्रा.पं.सदस्य दिपक पुजारी , माजी ग्रा.पं.सदस्य सुनिल कुभांर , शामराव पाटील ,राजू मुधाळकर , गजानन वाईगडे , सुहास माने , बाळासो शेटके , सौ.उषाताई चौगुले शिवसेना महिला तालुका प्रमुख व मानेनगर ,अंबाईनगर मधील महिला व नागरिक उपस्थित होते.हुपरीहून हुमायून नदाफ
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा