Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसीचे यश..!
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे नुकताच एम. फार्मसीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात नगाव एज्युकेशन सोसायटीच्या गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
महाविद्यालयात अंतिम वर्ष एम. फार्मसीमध्ये प्रथम रिझवान शेख (८.८९ CGPA), द्वितीय दिपक सूर्यवंशी (८.४६ CGPA), तृतीय क्रमांक ललित गाडीलोहर (८.२८ CGPA) याने मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मनोहर भदाणे, उपाध्यक्षा ज्ञानज्योती भदाणे, अध्यक्ष राघवेंद्र भदाणे, प्राचार्य डॉ. अनिलकुमार टाटिया, उपप्राचार्य डॉ सुफियान अहमद यांच्यासह प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.
दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक व शिक्षकांना दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा