Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
सीएमपी वेतन प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन करणारी उस्मानाबाद जि.प मराठवाड्यात दुसरी.
सीएमपी वेतन प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन करणारी उस्मानाबाद जि.प मराठवाड्यात दुसरी.
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.6 जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख यांचे वेतन सीएमपी वेतन प्रणाली द्वारे करून शिक्षकांचे वेतनाला होणारा विलंब टाळून कायम स्वरूपी शिक्षक वेतनाबाबत आनंदी राहावा व समस्या मुक्त व्हावा यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने वारंवार झेडपी अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचे कडे पाठपुरावा केला होता.अध्यक्षा कांबळे यांनी सीएमपी वेतन प्रणाली तातडीने कार्यान्वित करत जिल्हा परिषद उस्मानाबाद च्या इतिहासात नोंद होईल असा निर्णय घेऊन ऑगस्ट २०२० चा पगार सीएमपी वेतन प्रणाली द्वारे केला.
कमी कालावधीत सीएमपी कार्यान्वित करून जिल्हा परिषद उस्मानाबाद च्या इतिहासात सुवर्ण अक्षराने सीएमपीचे नाव लिहिले गेले अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सीएमपी वेतन प्रणालीचा पाया रचला तर सीएमपी प्रमुख बिटूबाई क्षीरसागर यांनी कळस चढवला.
शिक्षण विभाग व अर्थ विभागातील सर्व अधिकारी यांनी खुप मेहनत घेतल्यानेच सीएमपी वेतन प्रणाली द्वारे शिक्षकांचा पगार कॅफो टू डायरेक्ट शिक्षकांचे खात्यावर जमा झाला आहे.इतर जिल्हा परिषद समोर उस्मानाबाद जिल्हा परिषदेला एक आदर्श ठेवता आला.
याबद्दल प्रहार शिक्षक संघटना उस्मानाबाद च्या वतीने झेडपी अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे,शिक्षणाधिकारी प्रा.रामलिंग काळे,उप शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, सहाय्यक लेखाधिकारी शरद माळी, सीएमपी वेतन शिक्षण विभाग प्रमुख बिटूबाई क्षीरसागर या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा समन्वयक दत्तात्रय पुरी, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, उपाध्यक्ष हनुमंत माने, अमिन मुलाणी,चेपटे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा