Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

शेगाव शहरातील स्वच्छतेबाबत प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद च्या आवारात तीन ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण




शेगाव प्रतिनिधी :शेगाव शहरातील स्वच्छतेबाबत प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद च्या आवारात तीन ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण चालू केले होते . 

त्या उपोषणाची सांगता दिनांक
4ऑक्‍टोबरला नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी नगरपरिषद द्वारा  लेखी आश्वासन पत्र देऊन उपोषण कर्त्यांचे उपोषण सोडले.

शेगाव शहरातील घाण कचरा उचलण्याचे खाजगी कंत्राट दिलेले असताना शहरात कचरा शासकीय कार्यालयासह शहरात व प्रभागांमध्ये विविध ठिकाणी विखुरलेला आहे. प्रहार संघटनेतर्फे 2 ऑक्टोंबर ला महात्मा गांधी जयंती निमित्ताने अभिनव 'आखे खोलो' आंदोलनाद्वारे शहरातील कचरा गोळा करण्यात आला. 

शहरातील घाण व कचरा संकलित करून तो नगरपालिका कार्यालयाच्या आवारात टाकण्यात आला. त्या ठिकाणी दुपारपासून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली,परंतु रात्रीपर्यंत नगर परिषद प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद या ठिय्या आंदोलनाला देण्यात न आल्याने दिनांक 3 ऑक्टोबरला त्याचे रूपांतर प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोगे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणात करण्यात आले. 

नगरपालिका हद्दीतील व बाजारपेठेतील घाण कचरा गोळा करण्याचे कंत्राट नगरपालिकेने नाशिक येथील खाजगी कंत्राट दाराला दिले आहे. त्याकरिता त्याला लागणारी सर्व वाहने नगरपालिकेने त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. 

शहरात ठिकठिकाणी घाण कचरा पडून असल्याचे दिसत आहे त्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने उपोषणाला तीन ऑक्टोंबर पासून सुरुवात करण्यात आली होती. प्रहारच्या वतीने मागणी करण्यात आलेले आठ विषयावर उचित कारवाई करण्याचे आश्वासन दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी लेखी स्वरूपात देण्यात आले.
आवश्यकता असल्यास चौकशी समिती नेमून कार्यवाही करू  असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी उपोषणकर्त्यांना दिले व त्यानंतर उपोषणाची सांगता कार्यकर्त्यांना शरबत देऊन करण्यात आली.

या पत्रामध्ये असे नमूद आहे की शेगाव शहरात घनकचरा संकलन कंत्राट मायक्रो इकॉनोमिकल कंपनी नाशिक यांना देण्यात आला असून सद्यस्थितीत त्यांचे मार्फत कायवाही चालू आहे . 

उपरोक्त कामाबाबत करारनाम्यानुसार कारवाई होत नसल्याचे दिसल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. या पत्राच्या प्रतिलिपि तहसीलदार व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शेगाव यांना माहिती सादर करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध