Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०
गोंदेगाव येथे शेतकऱ्यांना कृषीधुताकडून मार्गदर्शन..!
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्न एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली येथील विद्यार्थी गौरव प्रदीप येवले याने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत म्हणून शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व विविध कृषी विषयक अपबद्दल माहिती-जनजागृती केली.
त्याच बरोबर पिकांचे नियोजन व त्यांचे कीड व्यवस्थापन जसे की, बोंड अळी, माबा, तुडतुडे,पांढरी माशी आदीसह पिकांवर येणारे विविध रोग जसे की करपा, मुरडा, टिपका,सड यांचे निदान कसे करावे यांची माहिती दिली तसेच सेंद्रिय शेती व तिचे फायदे आणि त्यावरील औषधी जसे जीवामृत बीजामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांची माहिती आणि जैविक खते जसे की, कंपोस्ट खत गांडूळ खत,नाडेप खत आदींची माहिती दिली. तसेच प्सचा वापर करून गुरांचे व्यवस्थापन, बागातील पिकांच्या उत्पादन वाढीच्या पद्धती, व्यवसायामध्ये प्सचा होणारा वापर याविषयी शेतकन्यांना माहिती दिली.
त्यावेळी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.एन.एम. म्हस्के,ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी प्रा.व्ही.ओ.मोरे, त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.एन.एस.रोडे, डॉ.राम आगळे, डॉ.सुशील सातपुते. डॉ.एस.एफ.शिंदे, प्रा.एम एस लकडे, प्रा.लंगडे,प्रा.बी.जी.म्हस्के, डॉ.बी.एन.थोरात यांचे मार्गदर्शन मि ळाले. यावेळी गावातील दत्तक शेतकरी प्रकाश महलपुरे यांच्यासह तसेच अविनाश पवार, विठ्ठल पाटील,सुधीर महाले,नाना निकम ,शिवराम महाले,रवींद्र सावळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा