Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०
देशातील भाजपाशाशीत सरकारकडून, जनतेवर अन्याय - विजय आंभोरे
शेगांव शहरं(उमेश राजगुरे ) दि.7देशातील ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे त्या राज्यात मागासवर्गीय जनतेवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी ६ ऑक्टोबर रोजी केला आहे.
भाजप सरकार कडून मागासवर्गीय, शेतकरी, शेतमजूर यासह उपेक्षित घटकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुरू असल्याच्या घटना दररोज प्रसार माध्यमातून आपल्याला कळतात तर नुकतीच हातरस येथील वाल्मिकी समाजातील मुलीवर तेथील गाव गुंडांनी बलात्कार करून तिला जखमी केले व अखेर ती मरण पावली त्यामुळे उत्तर प्रदेशात असलेल्या योगी सरकारच्या बेजबाबदार पणामुळे असे प्रकार तेथे घडत आहेत म्हणून भाजप सरकारच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता सज्ज राहवे असे आवाहन देखील यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केले आहे. तसेच योगी सरकार विरोधात घोषणा देत निषेध नोंदवला त्यानंतर जिल्ह्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला असून पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे.
यावेळी महेंद्र गवई, प्रदिप अंभोरे व ब्रह्मनंद इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण गवई, शेगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय काटोले, भैय्या जैस्वाल, राजू राऊत, संजय माठे, भिकू सारवन, पवन पचेरवाल, अनिल सावळे, अनंता शेळके, ज्ञानेश्वर शेजोळे, गोपाल उज्जेनकर, रहीम खा, अशोक तायडे, अभिजित अंभोरे, करणं सारवन, खुशाल सारवन, दीपक सारवन, शाहिल चावरे, शुभम चावरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक प्रमोद अवसरमोल यांनी तर आभार लक्ष्मणराव गवई यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा