Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जिल्ह्यातील दोन, शेळगाव 5.3 व मुळज 2.7 मेगावॅट क्षमतेचेदोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित ! ! !
जिल्ह्यातील दोन, शेळगाव 5.3 व मुळज 2.7 मेगावॅट क्षमतेचेदोन सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित ! ! !
उस्मानाबाद,(राहूल शिंदे) दि.7:-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ई.ई.एस.एल.) ने 02 ऑक्टोबर 2020 ला उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळगाव (ता.परांडा) आणि मूळज(ता.उमरगा) येथे अनुक्रमे 5.3 व 2.7 मेगावॅट क्षमतेचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले. या गावासह लगतच्या आठ हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रकल्प प्रमुख संजोग मोहिते यांनी दिली.
हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र प्रकल्प प्रमुख दीपक कोकाटे यांचे मार्गदर्शन तसेच महावितरण चे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांचे सहकार्य लाभले.
हरित ऊर्जा प्रकल्पासाठी ई.ई.एस.एल.ची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात कमी वीज वापरायची इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विक्री करण्यात आली. आता कंपनीतर्फे विविध राज्य सरकारांची करार केला आहे. त्यापैकी दोन आगळे प्रकल्प 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले.
योजनेअंतर्गत महावितरण, महानिर्मिती सोबत वीज खरेदी करार केले असून त्याद्वारे राज्यातील 110 प्रकल्पातून दिवसाला नऊ लाख युनिट सौर उर्जा मिळत आहे. 70 हजार शेतकऱ्यांना ती वापरता येईल, याद्वारे एक लाख नऊ हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन वाचवता येणार आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 200 आणि 300 अशा 500 मेगावॉट वीज खरेदी करारा नंतर पुन्हा महावितरण, महानिर्मिती सोबत 280 मेगावॅटचा करार करण्यात आला आहे. एकूण या योजनेअंतर्गत 780 मेगावॅट विजेची करार होत आहेत.
शेतीपंपासाठी या वाहिन्या द्वारे वाजवी दरात कशी चीज करता देता येईल. याचा त्याद्वारे प्रमुख उद्देश आहे. महावितरणची जिथे केंद्र आहेत. तेथील पडकी जमीन यासाठी वापरली जात आहे. छोटे प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांना व अन्य होणारा फायदा-
1) उपकेंद्र लगत प्रकल्प उभारल्याने वीज हानी होत नाही. शेतीपंपासाठी फिडर देखील येथेच जोडला जातो. त्यामुळे विजेची आणि कमी होत आहे.
2) स्टेशनच्या बाजूला सौर ऊर्जा प्रकल्प लावल्यामुळे वीज हानी कमी होऊ होण्यास मदत होते. शेतकरी वीज बिल भरण्यास मदत करतील.
3) शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा.
4) प्रदूषण विरहित आणि पर्यावरण मित्र प्रकल्प.
5)सौर कृषी वाहिनी साधारण पाच ते दहा गावातून जाते. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी 24 तास वीज उपलब्ध झाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा